Thursday, December 4, 2014

महाराष्ट्राला हे नवीन आहे !


काही दिवसापूर्वी नागपूर च्या RTO कार्यालयात एक महिला चालत आली..तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनी करण करायचे होते...

त्या महिलेने अर्ज घेतला तो व्यवस्थित स्वहस्ते भरला कागदपत्रे घेउन ती अनुज्ञाप्ती मिळवण्याच्या रांगेत उभी राहीली..हळुहळू क्रमांक पुढे सरकत होते..त्या महिलेची कागदपत्रे घेतली गेली..तिने पैसे भरले.अनुज्ञाप्राप्ती साठी फोटोही काढून घेतला..सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्र वाचली नाव अमृता देवेंद्र फडणवीस ..तो उडालाच..म्हणजे महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी रांगेत उभी होती इतका वेळ..मग पळापळ सुरु झाली मु RTO .ARTO कार्यालय नव्हते ..तिसऱ्या क्रमांकाचे अधीकारी पारकींग पर्यत पळतआले नमस्कार चमत्कार झाले सौ.मुख्यमंत्रीना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे.त्याच्या परवाण्याचे त्वरीत नुतनी करण करुन देण्यात येईल ..

सौ.मुख्यमंत्रीयांनी गोड शब्दांत नकार दिला.मी अर्ज भरलाआहे पैसेही भरले आहे आणि माझा फोटो ही काढला आहे.आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा..गाडी सुरुकरुन बाय म्हणत त्या निघुनदेखील गेल्या ..एव्हाना अधीकार्- याचे कपाळ घामाने थबथबले होते..मुख्यमंत्र्यांची पत्नी अन रांगेत RTO कार्यालयात उभी राहाते यावर विश्वास बसत नव्हता .याची कल्पना कोणी केली नव्हती.

Wednesday, December 3, 2014

महाराष्ट्र में अब कारोबार करना हुआ आसान


महाराष्ट्र में कारोबार करना अब आसान होगा। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन यानी एमआईडीसी ने अपने इलाके में फैक्टरी लगाने पर मंजूरी की संख्या घटा दी है। कारोबार के शुरुआती चरण में अब तक कारोबारियों को 14 मंजूरी लेनी होती थी लेकिन अब केवल 5 मंजूरी लेनी होगी।

इन मंजूरी में जमीन आवंटन और लीज, मॉर्टगेज, बिल्डिंग प्लान, अंतिम फायर एनओसी और बिल्डिंग कंप्लिटिशन सर्टिफिकेट शामिल है। इसके अलावा फैक्टरी लाइसेंस अब केवल 3 दिन में रिव्यू हो सकेगा।

बॉम्बे शॉप्स एंड एस्टबलिशमेंट एक्ट के तहत भी अब 3 दिन में मंजूरी मिल सकेगी। सूबे की नई सरकार के आदेश के बाद एमआईडीसी ने कारोबारियों को ये सुविधा देने का फैसला लिया है।




http://hindi.moneycontrol.com/mccode/news/article.php?id=111064

Sunday, November 23, 2014

डिजीटल महाराष्ट्र


नवी दिल्ली : सन 2015 या वर्षात महाराष्ट्राला ‘डिजीटल महाराष्ट्र’ बनवू असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये हिंदुस्थान टाईम्स वृत्त समुहातर्फे आयोजित ‘देश बांधणीत नेतृत्व’ या विषयावर आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 2015 हे वर्ष डिजीटल सेवा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात महाराष्ट्राला डिजीटल महाराष्ट्र बनविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. राज्य शासनाचे प्रत्येक कार्यालय हे ई-सेवेद्वारे जोडण्यात येणार आहे. डिजीटल इंडियाच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांना प्रशासनाद्वारे उत्तम सेवा मिळावी यासाठी ‘सेवा अधिकार कायदा’ अंमलात आणला जाईल, ज्याद्वारे सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल. उत्तम सेवा देणे हे प्रत्येक विभागाचे कार्य असेल आणि उत्तम सेवा मिळणे हा नागरिकांचा अधिकार असेल.

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक वाढीसाठी परवान्यांच्या सुलभीकरणास सुरुवात झाली आहे. कोणत्याही उद्योग परवान्यांसाठी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जर एखादा उद्योजक 100 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असेल तर ‘मैत्री’ या योजनेनुसार सर्व सुविधा स्वत: शासन पुरविणार आहे. राज्य शासनातील संबंधित विभागांच्या सचिवांना उद्योग परवाने प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा दर महिन्याला आपण स्वत: घेणार आहे.

औद्योगिक वाढ, वीज व पाणी व्यवस्थापन, कृषी विकास त्याचबरोबर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण व 20 लाख घरांच्या निर्मितीचा प्रश्न या विषयांकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत असून त्यासंबंधीचे नियोजन व धोरण आखण्याची प्रक्रिया सुरु आहे. ‘मेक ईन इंडिया’ या संकल्पनेचा आदर्श समोर ठेऊन आम्ही ‘मेक ईन महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाषणानंतर एनडीटीव्हीच्या संपादक बरखा दत्त यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बरखा दत्त आणि उपस्थित मान्यवरांच्या विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. एनडीटिव्हीचे एडीटर इन चिफ संजन नारायणन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

'महान्यूज' मधील मजकूर 

Thursday, November 20, 2014

पारदर्शी कारभार


सत्तेत आल्यावर पारदर्शी कारभार देण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी  प्रशासकीय कामकाजासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेत राज्यात 'स्वच्छता' अभियान सुरू केले. प्रशासकीय विभागातील बदल्यांचे विकेंद्रीकरण, तीन दिवसांत दुकाने व कारखान्यांचे परवाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मालमत्ता जाहीर करण्याचे बंधन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या निर्णयांमुळे प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप कमी होणे आणि लाचखोरीला आळा बसण्यासोबतच उद्योग व रोजगारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर केंद्र सरकारमधील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय अमलात आणले. याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातही 'स्वच्छ' कारभारासाठी निर्णयांचा धडाका लावला आहे. उद्योग व दुकानांना तीन दिवसांत परवाने न मिळाल्यास तो मिळाल्याचे गृहीत धरले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अशा परवाने वाटपात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेलच; शिवाय उद्योग व कारखान्यांना चालना मिळणार आहे. 

सरकारी विभागातील बदल्यांमध्ये आजवर नेहमीच राजकीय नेते आणि मंत्री यांचा हस्तक्षेप राहिला आहे. आपल्या 'अर्थपूर्ण' कामांत अडथळा ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली घडवून आणण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर, जलसंपदा तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत. जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंतच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते. हे अधिकार आता खात्याच्या सचिवांना देण्यात आले. अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मंत्र्यांचे अधिकार मुख्य अभियंत्यांकडे देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनातील बदल्यांचे सारे अधिकार मंत्र्याकडून काढून विभागाच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील भ्रष्टाचाराला चाप
महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीनुसार राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर वर्षी ३१ मे पूर्वी त्यांच्या मालमत्तेसंबंधी मत्ता व दायित्व याबद्दलचे विवरणपत्र संबंधित विभागांना सादर करणे आवश्यक असते. मात्र या नियमातून स्थानिक संस्था व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. मात्र, आता सर्व नगरपालिका, महानगरपालिका, सिडको, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे व अन्य निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर वर्षी, मालमत्तासंबंधीची माहिती त्यात्या विभागाला देणे बंधनकारक असेल.

नवीन कारखाना किंवा दुकान सुरू करण्याकरिता अर्ज केल्यावर तीन दिवसांत परवाना.
विलंब झाल्यास 
परवानगी मिळाल्याचे गृहीत धरता येईल.
कंत्राटदारांनाही तीन 
दिवसांत परवाने पुरवणार. 
हव्या तितक्या कालावधीसाठी परवाना मिळणार.
दुकाने, कारखाने व कंत्राट परवान्यांची प्रक्रिया लवकरच ऑनलाइन करणार.
जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांऐवजी सचिवांकडे .
अन्न व औषध प्रशासनातील बदल्यांचे अधिकार विभागाच्या आयुक्तांकडे.

उद्योगांना मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणार- मुख्यमंत्री

मिहान प्रकल्पात जास्तीतजास्त उद्योग आणण्यासाठी केंद्राच्या मदतीने प्रयत्न सुरू असताना उद्योगांसाठी लागणाऱ्या मंजुरींची संख्या ७६ वरून २० वर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रामगिरीवर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मिहानसंदर्भातील निर्णय प्रक्रिया सुरू झाली असून त्या संदर्भात काही दिवसांपूर्वी नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार काही अडचणी आहेत. मात्र, त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील मिहान परिसरात केंद्राच्या अखत्यारित येत असलेल्या आयआयएम, एम्स, प्लास्टिक टेक्नॉलॉजीसारख्या उद्योगांना जागा देण्याची व्यवस्था राज्य सरकार करू शकते. त्यासाठी नियमात बदल करण्याचा विचार आहे. केंद्राशी संबंधित उद्योग एकाच ठिकाणी राहावे, या उद्देशाने त्यांना राज्य सरकारतर्फे जागा उपलब्ध केली जाऊ शकते आणि तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. पूर्वी एखादा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ७६ मंजुरी लागत. मात्र, ती संख्या २० वर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकाच विभागातील पाच ते सहा मंजुरी लागत असल्याने त्या सर्व एकाच विभागातून कशा मिळविता येतील त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. मिहानमध्ये जास्तीत जास्त उद्योग वाढले पाहिजे, त्यांना स्वस्तात वीज उपलब्ध झाली पाहिजे, असा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने केंद्र पातळीवर चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहानमध्ये मोठे उद्योग यावे, यासाठी काही उद्योजकांशी चर्चा केली आहे. केवळ उद्योगच नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मिहानमध्येच प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. नगरविकास विभागाकडे विदर्भातील विविध शहरातील प्रलंबित असलेले प्रस्ताव मागविण्यात आले असून ते मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. उद्योगांसाठी लागणारी वीज निम्म्या दरात म्हणून ४.३० रुपयेप्रमाणे देण्याचा प्रयत्न सुरू आह.े त्या संदर्भातील मंगळवार किंवा बुधवापर्यंत निर्णय होईल. त्यांना वीज दिली तर उद्योग येतील, असेही फडणवीस म्हणाले.

आता दुष्काळग्रस्त गावाचाच पंचनामा
ज्या गावाची ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असेल अशा दुष्काळग्रस्त गावांमध्ये व्यक्तीगतरित्या पंचनामा न करता त्या गावाचा पंचनामा करून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा आढावा घेतला जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी या भागाचा दौरा केला आहे. तेथे अनेक गावे दुष्काळग्रस्त झाल्यामुळे शेतक ऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली की, वैयक्तिकरित्या पंचनामा केला जात असे. मात्र, ज्या गावाची ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असेल अशा गावांचा एकत्रित पंचनामा करून तो राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवून त्याप्रमाणे गावातील प्रत्येकाला मदत मिळेल आणि प्रक्रिया सोपी आणि सुलभ होईल. या संदर्भात मुख्य सचिवांना दिल्लीला पाठविण्यात आले असून ते आले की, त्या संदर्भात निर्णय प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

पोलिसांना अधिक अधिकार, पण जबाबदारीही!


राज्यातील पोलिसांची गुन्ह्य़ांच्या तपासातील कार्यक्षमता वाढावी तसेच त्यासाठी लागणारे विविध प्रशासकीय निर्णय तात्काळ घेता यावेत, यासाठी आणखी अधिकार बहाल केले जातील. परंतु त्याचवेळी त्यांच्यावर जबाबदारीही निश्चित केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. 

राज्य पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते. फौजदारी गुन्ह्य़ांची चौकशी तसेच प्रशासनाशी संबंधित प्रक्रियेत गती यावी, यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे, असे शासनाचे मत आहे. मात्र त्याचवेळी पोलीस दलावर नियंत्रण राहावे, असाही आमचा प्रयत्न आहे. पोलीस दलातील बदल्या आणि अन्य प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पोलीस दलासाठी लागणारी सामग्री खरेदी करण्याबाबत आजही पोलिसांना १९७३ चे अधिकार कार्यरत आहेत. वर्षभरात फक्त ५० हजार रुपयांची खरेदी त्यामुळे होऊ शकते. या अधिकारात वाढ व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तसेच पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ देण्याचाही आपला विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात माजी मंत्री तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील खटल्यांसाठी मंजुरी मिळण्याबाबतची प्रकरणे प्रलंबित आहेत, याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, याबाबत आपण नव्याने नियुक्त झालेल्या महाधिवक्तयांचे मत अजमावणार आहोत. अशा प्रकरणात वेळेत मंजुरी मिळाली पाहिजे. अन्यथा ही प्रकरणे मंजूर झाली असे समजावे, असाही आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आणखी दोन मेट्रो



Metro
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

राज्याचा कारभार हाती घेताच देवेंद्र फडणवीस सरकारने विविध समस्यांनी ग्रासलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याचे संकेत दिल्यानंतर आज सरकारने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गावर या मेट्रो धावणार असून त्यामुळे मुंबई खऱ्या अर्थाने 'मेट्रो सिटी' होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रोबरोबरच वांद्रे-कुर्ला जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अशा असतील नव्या मेट्रो

O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही मेट्रो तब्बल ४० किलोमीटरचा प्रवास करेल. या मेट्रो मार्गावर ३६ स्थानके असतील व हा मार्ग पूर्णत: भुयारी असेल.

O वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली हा मेट्रो मार्ग ३२ किलोमीटरचा असून त्यावरील २४ स्थानके भुयारी असतील तर ६ उन्नत (एलिव्हेटेड) असतील.

O दोन्ही मेट्रोचे काम मुंबई मेट्रो रेल महामंडळाद्वारे ६-७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.


O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी येणारा अंदाजित खर्च २५ हजार कोटी रूपये एवढा, तर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गासाठी १९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.

O मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारली जाईल. उर्वरीत ५० टक्के खर्च केंद्र आणि राज्य सरकार किंवा प्राधिकरणातर्फे करण्यात येईल.

वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर

वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर दररोज गर्दीच्या वेळी तासाला सरासरी १२ हजार वाहने गर्दी करतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले. यावर उपाय म्हणून ४ उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्यात येणार आहे.
O प्रस्तावित चार उड्डाणपुलांपैकी दोन उड्डाणपूल वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंक आणि सी-लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल असे दुपदरी असतील. तिसरा धारावीकडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणारा तर चौथा कलानगर जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारा असेल. हे पूल तीन पदरी असतील.

O धारावीकडून सी-लिंककडे जाणारी वाहतूक अव्याहत ठेवण्यासाठी सरकारी जमिनीवरून ३०० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २२७ कोटी रुपये आहे.